25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रमहिलांबद्दल अनादर नाही : चंद्रकांत पाटील

महिलांबद्दल अनादर नाही : चंद्रकांत पाटील

एकमत ऑनलाईन

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना ‘घरी जा, स्वयंपाक करा, असा मागास सल्ला देणा-या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका झाली. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पाटील यांना सुनावले. त्यानंतर राज्य महिला आयोगाने पाटील यांना नोटीस पाठवली आणि खुलासा मागितला. आता पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिसीला उत्तर देताना आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, सावली, आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणा-या जगातील सर्वांत मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दु:ख नाही,’ असे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्राग्याने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो, असे पाटील यांनी पत्रात पुढे नमूद केले आहे.

काय म्हणाले होते पाटील..
मध्य प्रदेशच्या सरकारने दोन दिवसांमध्ये दिल्लीत असं काय केलं ज्यामुळे मध्य प्रदेशात आरक्षण मिळालं, असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला होता. त्यावरून चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. कशाला राजकारणात राहता, घरी जा, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंवर घणाघाती टीका केली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या