27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रमहिला वारक-यांना मिळणार सुविधा

महिला वारक-यांना मिळणार सुविधा

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या महिला आयोगाने आषाढी आणि कार्तिकी वारीदरम्यान महिला वारक-यांच्या वैयक्तिक स्वच्छता आणि सुरक्षेकरिता नवीन निर्देश जारी केले आहेत. या निर्देशांनुसार आता वारी काळात दर दहा ते वीस कि. मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन असणे आवश्यक असल्याचे निर्देश जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहेत.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये यासंदर्भात ज्या मार्गावरून वारी मार्गक्रमण करते, त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिका-यांना निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून देहू/आळंदी/पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारक-यांमध्ये सहभागी होणा-या महिलांची संख्यादेखील लक्षणीय असते, असा उल्लेख या पत्रात आहे. वारकरी महिलांची संख्या लक्षात घेत राज्य सरकारने वारीमध्ये सहभागी होणा-या महिलांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत निर्देश जारी केले आहेत.

त्यामध्ये दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था असावी. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी आणि महिला सुरक्षिततेकरिता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परिसरात दर्शनी भागात लावावेत, असे म्हटले आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या