21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeनांदेडमाजी खा. सुभाष वानखेडे शिवसेनेत

माजी खा. सुभाष वानखेडे शिवसेनेत

एकमत ऑनलाईन

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
मुंबई/हिंगोली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुभाष वानखेडे यांनी आज मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे नांदेडचे संपर्क प्रमुख आनंद जाधव, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंद बोनढारकर, उमेश मुंढे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. वानखेडे शिवसेनेचे माजी आमदार, खासदार आहेत.

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. हिंगोली जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघात बहुतांश वेळा शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र, विधानसभा मतदारसंघात कळमनुरीवर शिवसेनेची, वसमतवर राष्ट्रवादी तर हिंगोली विधानसभेवर भाजपची पकड आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाला मागील काळात जिल्ह्यात विस्तार करता आला नाही. त्यातच आता शिवसेनेला एकीकडे बंडखोरीचे ग्रहण लागलेले असताना आता यापूर्वी पक्षाला सोडून गेलेल्यांची घरवापसीदेखील सुरू झाली.

माजी खासदार आणि सध्या कॉंग्रेसमध्ये असलेले सुभाष वानखेडे यांनी आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. झाले-गेले विसरून ठाकरे यांनी वानखेडे यांना पुन्हा शिवसेनेचा भगवा दिला. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, कळमनुरीचे आमदार तथा जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले होते. ही कमतरता भरून काढण्यासाठी तसेच पाटील, बांगर यांना टक्कर देऊ शकेल, अशा नेत्याची शिवसेनेला गरज होती. वानखेडे यांच्या घरवापसीमुळे हे शक्य होऊ शकेल, असे बोलले जात आहे.

 

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या