22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईत नियम मोडणा-यांना ५०० ते ५० हजारांपर्यंत दंड

मुंबईत नियम मोडणा-यांना ५०० ते ५० हजारांपर्यंत दंड

एकमत ऑनलाईन

मुंबई : जगभरात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या घातक व्हेरिएंटने चिंता निर्माण केल्यानंतर मुंबईचे प्रशासनही सतर्क झाले आहे. तसेच ज्या देशात ओमिक्रॉनचा शिरकाव झालेला आहे अशा दक्षिण आफ्रिकेतून हजारो प्रवासी मुंबईत आल्याने ही चिंता अधिकच वाढली आहे. याचा विचार करून महापालिका प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक नियम अधिक कडक केले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणा-यांना ५०० रुपये ते ५० हजारांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. यात रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि मॉल्समध्ये लसीचे दोन डोस घेतल्याशिवाय प्रवेश केल्यास दंड आकारला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी म्हटले आहे.

नागरिकांना लस घेणे अनिवार्य करण्यात आले असून बाहेर फिरत असताना आता तोंडावर मास्क असणेही बंधनकारक करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे दोन डोस न घेतलेल्या ग्राहकांना आता हॉटेल, रेस्टॉरंट्समध्ये प्रवेश नाकारला जाणार आहे. तसेच या नियमाचे उल्लंघन केल्यास दंड आकारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

मुंबई महानगरपालिकेने कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याचे पाऊल उचलले आहे. मुंबईत टॅक्सीतून किंवा खासगी वाहनांतून प्रवास करणा-या प्रवाशांना आणि चालकाला देखील ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. त्याचप्रमाणे बसमधून प्रवास करणा-यांनी नियम मोडल्यास प्रवाशाला ५०० रुपये आणि खासगी बस असल्यास बसमालकाला १० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. तसेच मुंबईतील संस्था आणि आस्थापनांनी कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांनाही १० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या