24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबई-गोवा महामार्गावर एलपीजी टँकर उलटला

मुंबई-गोवा महामार्गावर एलपीजी टँकर उलटला

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर एलपीजी वाहतूक करणारा टँकर उलटल्याचे वृत्त आहे. या टँकरची क्षमता मोठी असल्यानं या गॅस गळतीचा धोका कमी करण्याच्या कामाला उशीर लागणार आहे. त्यामुळं मुंबई-गोवा महामार्ग रात्रभर बंद राहणार आहे.

दुर्घटनाग्रस्त टँकरची २८ हजार किलो एलपीजी गॅस वाहून नेण्याची क्षमता आहे. टँकर पलटल्यानंतर यातून वायू गळती होत होती. प्राथमिक स्वरुपाची काळजी घेऊन ही वायू गळती रोखण्यात आली आहे. पण टँकरमधील वायूची क्षमता पाहता, सर्व सुरळीत होईपर्यंत या महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यानुसार, रात्रभर मुंबई-गोवा महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

हा महामार्ग बंद असला तरी वाहनांसाठी याला पर्यायी मार्ग आहे. हा पर्यायी मार्ग म्हणजे लांजा-देवधे-पुणद पुढे रत्नागिरीतून मुंबई हायवेला जाता येऊ शकते. तसेच पालीमार्गे देखील बाहेर पडता येऊन तिथून दाभोळमार्गे मुंबईकडं जाता येऊ शकतं. असे दोन पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. दरम्यान, या वायू गळतीचा आढावा घेण्यासाठी उरण आणि गोव्यातून घटनास्थळी तज्ज्ञांची टीम दाखल होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या