22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदेंना युवासेना प्रमुख करण्याची मागणी

मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदेंना युवासेना प्रमुख करण्याची मागणी

एकमत ऑनलाईन

मुंबई – राजकीय उलथापालथ घडवत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्तांतर घडवलं. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. शिंदे यांनी भाजपसोबत घरोबा करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. त्यामुळे आता शिवसेना कोणाची असा प्रश्न उपस्थित होत असून हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना युवासेना प्रमुख करण्याची मागणी करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट श्रीकांत शिंदे यांना युवा सेनेचे अध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यात झालेल्या बैठकीत जाधव यांनी ही मागणी केली. जाधव म्हणाले की, शिवसेनेची संगटना आपण बांधली. युवासेनेच्या बाबत एक चांगला चेहरा, लोकांना आवडणारा चेहरा, युवकांमध्ये रमणारा चेहरा म्हणून श्रीकांत शिंदे यांना युवासेना प्रमुख करावं, असंही जाधव म्हणाले.

खासदार जाधव यांच्या या विधानामुळे आता शिंदे गटाची नजर आता युवासेना प्रमुखपदावर दिसत आहे. मात्र यामुळे शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या