पुणे : पुणे जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक डोंगराकडेच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुळशी तालुक्यातील गुटके गावात जमीन खचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून मुळशी तालुक्यातील गुटके गावातील १४ कुटुंबांना दरीतील मोकळ्या जमिनीवर बांधलेल्या तात्पुरत्या निवासी इमारतींमध्ये स्थलांतरित केले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गावाला भेट दिली. पावसाळ्याच्या सुरुवातीस व्यक्ती आणि जनावरांच्या स्थलांतराचे निरीक्षण केले. वस्तीच्या वरच्या जागेत मोठ्या जागेवर १ फूट सरकला असल्याचे गेल्या वर्षी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.
अधिक अभ्यास केल्यावर असे आढळून आले की तेथे जमीन सरकली आहे. कठोर खडकाच्या पृष्ठभागावर उप-पृष्ठीय प्रवाह देखील होता. ते धोकादायक असल्याने रहिवाशांना गेल्या वर्षी पुणे जिल्हा परिषदेने बांधलेल्या सभा मंडपात स्थलांतरित करण्यात आले.