22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeमहाराष्ट्रम्युकरमायकोसिसचे मालेगावात तीन बळी

म्युकरमायकोसिसचे मालेगावात तीन बळी

एकमत ऑनलाईन

नाशिक : मालेगावात म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने धास्ती निर्माण केली आहे. मालेगावात आतापर्यंत सहा रुग्ण आढळले असून, त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य यंत्रणेने या मृत्यूंची गंभीर दखल घेतली असून, संभाव्य रुग्णांचे ट्रेसिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

म्युकरमायकोसिस हा आजार नवीन नाही. मात्र, एरवी वर्षातून त्याचे चार-पाच रुग्ण आढळून येत असत. मात्र सध्या शहरातील प्रत्येक कान, नाक, घसा तज्ज्ञाकडे रोज चार-पाच रुग्ण उपचारासाठी येत असल्याची धक्कादायक माहिती वैद्यकीय वर्तुळातून दिली जात आहे. त्यामुळे शहरात या रुग्णांची संख्या वाढत असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मालेगाव शहरात ६ जणांना म्युकरमायकोसिस झाला असून, त्यापैकी ३ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. दोन जण उपचार घेत असून एक रुग्ण या आजारातून बरा झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेतील अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत दुकानांना परवानगी द्या; मुंबईत व्यापा-यांची मागणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या