27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रम्हैसाळमध्ये ९ जणांचे सामूहिक हत्याकांड

म्हैसाळमध्ये ९ जणांचे सामूहिक हत्याकांड

एकमत ऑनलाईन

म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथील पशुवैद्यक तज्ञ डॉ. माणिक वनमोरे व पोपट वनमोरे या दोघा सख्ख्या भावांच्या कुटुंबीयातील तब्बल नऊ जणांनी विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या केली होती. खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून वनमोरे कुटुंबियांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. मात्र वनमोरे कुटूंबियांनी आत्महत्या केली नसून जेवणातून विष घालून या कुटूंबातील ९ जणांना मारले असल्याची असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

घटनास्थळी पोलिसांना सापडलेल्या दोन चिठ्ठ्यात वनमोरे बंधूंनी त्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देणा-या २५ खासगी सावकारांची नावे लिहिली आहेत. पोलिसांनी सर्व २५ सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करुन यापैकी १८ जणांना अटक केली. उर्वरित फरारी आरोपींच्या शोधासाठी परजिल्ह्यासह कर्नाटकात पोलीस पथके पाठविण्यात आली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या