21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रराऊतांना भेटण्यासाठी गेलेल्या खासदार, आमदारांची भेट तुरुंग प्रशासनाने नाकारली

राऊतांना भेटण्यासाठी गेलेल्या खासदार, आमदारांची भेट तुरुंग प्रशासनाने नाकारली

एकमत ऑनलाईन

मुंबई : पत्राचाळ प्रकरणी ईडीच्या चौकशीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली आहे. आज संजय राऊत यांना भेटण्यासाठी एक खासदार आणि दोन आमदार आले होते. मात्र, त्यांना संजय राऊतांची भेट घेण्यास तुरुंग प्रशासनाने नकार दिला आहे. संजय राऊतांना भेटण्यासाठी राजकारण्यांना न्यायालयाचे आदेश किंवा परवानगी मिळाल्यावर त्यांची भेट होऊ शकते अशी माहिती तुरुंगातील सूत्रांनी दिली आहे.

आज संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी एक खासदार आणि दोन आमदार आर्थर रोड जेलमध्ये आले होते. त्यांनी तुरुंग अधिका-यांकडे राऊत यांची भेट घेण्याची विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, तुरुंग प्रशासनाने खासदार आणि आमदारांना संजय राऊत यांची भेट नाकारली आहे.

तुरुंग नियमावलीनुसार केवळ रक्ताच्या नात्यातील कुटुंबीयच त्यांना भेटू शकतात, अशी माहिती अधिका-यांनी सांगितली आहे. त्यामुळे त्यांचा भाऊ आणि कुटुंबातील सदस्यांना त्यांना भेटण्याची परवानगी दिली जाईल अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे.
पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या