23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात सीबीआयला मिळणार एन्ट्री

राज्यात सीबीआयला मिळणार एन्ट्री

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे निर्णय बदलण्याचा धडाका सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारचे अनेक निर्णय एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून बदलण्यात आले आहेत. आता त्यामध्ये आणखी एका निर्णयाची भर पडणार आहे. ठाकरे सरकारने सीबीआयला राज्य शासनाची परवानगी घेतल्याशिवाय तपास करता येणार नाही, असा निर्णय घेतला होता. तो निर्णय बदलला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारने राज्यात तपास करण्यासाठी सीबीआयला बंदी घातली होती. एकनाथ शिंदे यांचे सरकार सीबीआयला राज्यात तपासासाठी परवानगी देणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे सरकारच्या काळात सीबीआयच्या तपासावर घातलेली बंदी उठवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार असताना २१ ऑक्टोबर २०२० रोजी सीबीआयला राज्यात तपास करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. ठाकरे सरकार सत्तेत असताना परवानगीशिवाय राज्यात सीबीआयला तपासणीचे अधिकार नव्हते. आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या