ठाणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांची उत्तर सभा ठाण्यात सुरू झाली असून, प्रथमच पक्षाच्या नेत्यांना बोलण्यास संधी दिली असून, सभेची सुरुवात पुण्याचे मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या भाषणाने झाली. वसंत मोरे यांनी यावेळी कोरोनाचा काळ आठवला तरी अंगावर काटा येतो. पण या काळात आम्ही रात्रीचा दिवस केला. गोरगरिबांच्या मदतीला धावून गेलो.
जनताही गरज लागली, मदत लागली की शिवतीर्थावर जाते. मग निवडणुकांवेळी ही जनता कुठे जाते, असा प्रश्न ठाण्यातल्या उत्तर सभेतून विचारला. तसेच राज ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी आपल्या सगळ््यांना खूप काम करावे लागेल, त्यादृष्टीने आपण कामाला लागूया, असंही ते म्हणाले. दुसरीकडे कोव्हिडची परिस्थिती हाताळताना ठाकरे सरकार अपयशी ठरलं. सरकारने जी कामं करायला हवी होती. ती कामं मनसेने केली, असा वार त्यांनी उत्तर मंचावरुन ठाकरे सरकारवर केला.