29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeमहाराष्ट्ररायगडावर पिंडदान करण्यात गैर काय?

रायगडावर पिंडदान करण्यात गैर काय?

एकमत ऑनलाईन

रायगड : संभाजी ब्रिगेडकडून काही दिवसांपूर्वी एक व्हीडीओ व्हायरल करण्यात आला होता. या व्हीडीओमध्ये रायगडावर पिंडदान विधी सुरू असल्याचे दिसत होते. यावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. मात्र आता पिंडदानामध्ये गैर काय असा सवाल काही हिंदुत्ववादी संघटना आणि शिवभक्तांनी उपस्थित केला आहे.

रायगडावर राम धुरी आणि त्यांचे काही सहकारी गेल्या अनेक वर्षांपासून हा विधी करतात. रायगडाच्या रक्षणासाठी वीरमरण आलेल्या, स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या मावळ्यांच्या स्मरणार्थ हा पिंडदान केले जाते. पितृपक्षात घराघरात हा विधी केला जातो. हा हिंदू संस्कृतीचा एक भाग आहे. त्यावर संभाजी ब्रिगेडने घेतलेला आक्षेप दुर्दैवी आहे, असे मत शिवभक्तांकडून व्यक्त केले जात आहे. तसेच हा व्हीडीओ व्हायरल करण्यापूर्वी पिंडदानाची पार्श्वभूमी आणि हेतू जाणून घेतला असता तर हा गोंधळ झाला नसता असे मतही शिवभक्तांनी व्यक्त केले आहे.

२४ सप्टेंबरला शाक्त शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून संभाजी ब्रिगेडचे हजारो कार्यकर्ते गडावर आले होते. याच दिवशी शस्त्रादहीद पितृश्राद्ध होते. त्यामुळे राम धुरी आणि त्यांचे सहकारी शस्त्राने जखमी झालेल्या योद्ध्यांच्या पिंडदानासाठी गडावर दाखल झाले होते. संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी हे पाहिले आणि त्याचा व्हीडीओ काढून व्हायरल केला. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

भावना समजून घेण्याची विनंती
रायगड संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांना याविषयी पत्र लिहिले होते. असे प्रकार टाळण्याचीही विनंती त्यांनी केली होती. त्यानंतर आता काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुढे येत हा आपल्या हिंदू संस्कृतीचा भाग असून त्यामागची भावना समजून घेण्याची विनंती केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या