29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeमहाराष्ट्ररिसॉर्ट प्रकरणी दोन आठवड्यांत उत्तर द्या

रिसॉर्ट प्रकरणी दोन आठवड्यांत उत्तर द्या

एकमत ऑनलाईन

मुंबई : दापोली रिसॉर्टप्रकरणी राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने या प्रकरणी २ आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. अनिल परब यांच्यासह भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकारलाही उत्तर देण्याचे आदेश हरित लवादाने दिले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ही माहिती दिली. किरीट सोमय्या यांनी सांगितले की, अनिल परब यांचे बेकायदा रिसॉर्ट तोडावे, यासाठी मी हरित लवादात याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल हरित लवादाने घेतली आहे. त्यामुळे अनिल परब यांचे रिसॉर्ट तुटणार, असे किरीट सोमय्या म्हणाले.

जुलै २०१८ मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या शपथपत्रात अनिल परब यांनी दापोली रिसॉर्टच्या जमिनीचे आर्थिक व्यवहार झाल्याचे घोषित केले होते. मूळ जमीन मालक विभास साठे यांच्याकडून एक कोटी रुपये देऊन दापोली रिसॉर्टची मुरुड गावातली जमीन विकत घेतली. अनिल परब यांनी आपल्या निवडणुकीच्या मालमत्तेमध्ये तसे लिहिले होते, असे परब म्हणाले. सोमय्या यांनी सांगितले की, अनिल परब यांनी स्वत:च्या सहीने मुरुड ग्रामपंचायत, दापोली येथील सरपंच यांच्या नावाने पत्र दिले होते. त्यात विभास साठेकडून दापोली साई रिसॉर्टची जमीन अनिल परब यांनी घेतली व त्यावरील रिसॉर्ट, व्यावसायिक बांधकाम अनिल परबच्या नावे करण्यात यावे, असा अर्ज दिला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या