27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्ररोज २ तास लोडशेडिंग!

रोज २ तास लोडशेडिंग!

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याच्या अनेक भागात आजपासून लोडशेडिंग सुरू झाले आहे. मुंबईला मात्र या लोडशेडिंगमधून वगळण्यात आले. एमएसईडीसीएलने ही लोडशेडिंग जाहीर केला आहे. त्यामुळे रोज दोन तास लोडशेडिंग होणार आहे. राज्यातील महावितरणच्या सुमारे तीन कोटी ग्राहकांना याचा शॉक लागणार आहे. विशेषत: विदर्भ, मराठवाडा, खान्देशात हे लोडशेडिंग करण्यात येत आहे.

राज्यात सध्या अडीच ते तीन हजार मेगावॅटचा तुटवडा आहे. सकाळी ६ ते १० आणि संध्याकाळी ६ ते १० या कालावधीत जपून वीज वापरण्याचे आवाहन एमएसईडीसीएलने केले आहे. देशांतर्गत कोळशाच्या तुटड्यामुळे विजेच्या पुरवठ्याच्या तुलनेत विजेच्या मागणीत अनपेक्षित वाढ झाल्याने हे लोडशेडिंग केले जात आहे. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आम्हाला २५०० ते ३००० मेगावॅटचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आम्ही लोडशेडिंग करत आहोत. आमच्याकडे कोणताही पर्याय उरला नाही, तसेच ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करावे, असे महावितरणच्या एका प्रवक्ताने म्हटले आहे.राज्यात वीज संकट निर्माण झाले आहे. वीजनिर्मितीसाठी कोळशाचा साठा पुरेशा उपलब्ध नाही. राज्यात दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. कोळसा नसल्याने वीज निर्मितीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे राज्याला भारनियमांच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.

वीज दरवाढीचाही शॉक
राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच आता वीज दरवाढीचा जोरदार तडाखा वीज ग्राहकांना सहन करावा लागणार आहे. राज्यात वीज नियामक आयोगाने गतवर्षी सप्टेंबर महिन्यात महावितरणच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर दरवर्षी होणार असलेल्या वीज दरवाढीच्या अनुषंगाने १ एप्रिल २०१९ पासून ६ टक्के वीज दरवाढ होईल. विशेष म्हणजे वीज ग्राहक संघटनांनी केलेल्या प्रचंड विरोधानंतरही राज्य वीज नियामक आयोगाने सप्टेंबर २०१८ मध्ये दिलेल्या आदेशानुसार राज्यभरात ही वीज दरवाढ होत आहे.

वीज बिलांचा ऐन उन्हाळ््यात झटका
उन्हाळा वाढत असल्याने पुढील दोन-तीन महिने पंखे, एअरकंडिशनर, कूलर, रेफ्रिजरेटर यांचा वापर वाढणार आहे. यामुळे राज्यातील घराघरातील विजेचा वापरही वाढणार आहे. त्यातच वीज दरवाढ होत असल्याने याचा फटका वीज ग्राहकांना बसणार आहे. अर्थात, एकीकडे महागाईने देश होरपळत असताना वीज दरवाढीची आर्थिक भुर्दंडही ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या