20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeमहाराष्ट्रलव्ह जिहाद प्रकरण, मुलगी मुलासोबत सापडली

लव्ह जिहाद प्रकरण, मुलगी मुलासोबत सापडली

एकमत ऑनलाईन

कर्नाटकमधील संकेश्वर पोलिसांनी घेतले ताब्यात
कोल्हापूर : कोल्हापूर लव्ह जिहाद प्रकरणी पोलिसांना अखेर यश आले आहे. बेपत्ता झालेली शाळकरी मुलगी मुस्लिम युवकासह सापडली आहे. कर्नाटकच्या संकेश्वरमध्ये हे दोघेही सापडले आहेत. या दोघांनाही संकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर कोल्हापूर पोलिस कर्नाटकात रवाना झाले आहेत. नितेश राणे यांनी सकाळीच कोल्हापूरमध्ये या मुद्यावरून आंदोलन केले होते.

आंदोलनानंतर कोल्हापूर पोलिसांनी मुलीचे अपरहण करणा-या संशयिताचा फोटो जाहीर केला होता. अल्ताफ काझी या २२ वर्षीय संशयिताचा फोटो कोल्हापूर पोलिसांनी प्रसिद्ध करत अपरहणकर्ता दिसल्यास ताबडतोब संपर्क करण्याचे आवाहन केले होते.

कोल्हापूरची ही अल्पवयीन मुलगी १७ ऑक्टोबरपासून बेपत्ता होती. इयत्ता नववीत असणारी ही मुलगी दिवाळीपूर्वीचा पेपर द्यायला गेली होती. पण परत घरीच आली नाही. यानंतर मुलीच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. मुलीसोबत मुस्लिम युवकही गायब झाल्यामुळे संशय बळावला आणि याला लव्ह जिहादचे वळण मिळाले.

या प्रकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू होती. पण पोलिसांकडून तपासाला गती येत नसल्यामुळे बुधवारी हिंदुत्ववादी संघटनांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात भाजप आमदार नितेश राणेही सहभागी झाले होते. मुलगी परत आली नाही, तर तांडव करू, असा इशारा नितेश राणे यांनी दिला. तसेच पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त करत त्यांनी कारवाईची मागणीही केली. धर्मांतर बंदीचा कायदा येत्या अधिवेशनात आणणार असल्याचेही नितेश राणे म्हणाले.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या