29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रलहान मुलांनाही कोरोनाचा धोका

लहान मुलांनाही कोरोनाचा धोका

एकमत ऑनलाईन

ठाणे : कोरोनाच्या तिस-या लाटेत लहान मुलांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. सरकारी आकडेवारीवरून हे दिसून येत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या लहानग्यांची काळजी घेण्याची गरज आहे. तिस-या लाटेमध्ये अंबरनाथ, बदलापूर, औरंगाबादमध्ये लहान मुलांनाही कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे.

अंबरनाथमध्ये दीड महिन्यात १०७ मुलांना लागण झाली आहे. बदलापुरात ८० मुले कोरोनाबाधित आढळली आहेत. मात्र, मुलांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण कमी आहे. औरंगाबादमध्ये ० ते ५ वयोगटातील १८ मुले गेल्या १० दिवसांमध्ये बाधित झाली आहेत. तर ६ ते १८ वयोगटातील तब्बल १४८ मुले कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. लहान मुलांना या सगळ्यापासून वाचवायचे असेल तर पालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर शहरात १ डिसेंबरपासूनची आकडेवारी चिंताजनक आहे.

अंबरनाथ शहरात १ डिसेंबर ते १३ जानेवारी या कालावधीत शून्य ते १५ वयोगटातल्या १०७ लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ८ मुलांना अ‍ॅडमिट करावे लागले, तर ९९ मुले घरीच बरी झाली. बदलापूर शहरात १ डिसेंबर ते १२ जानेवारी या कालावधीत शून्य ते १५ वयोगटातल्या ८० लहान मुलांना कोरोनाची लागण झाली. यापैकी ९ मुलांना अ‍ॅडमिट करावे लागले, तर ७१ मुले घरीच बरी झाली. उल्हासनगर शहरात १ डिसेंबरपासून १४ जानेवारीपर्यंत शून्य ते १५ वयोगटातील १४ मुलांना कोरोनाची लागण झाली. औरंगाबाद जिल्ह्यात शून्य ते ५ वयोगटातील १८ मुले १० दिवसांमध्ये बाधित झाली आहेत. ६ ते १८ वयोगटातील तब्बल १४८ मुले कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. मोठ्यांच्या तुलनेत लहानांना कोरोना होण्याचे प्रमाण तसे कमी असले, तरी ते दुर्लक्ष करण्याजोगे मात्र नक्कीच नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या लहान मुलांची जरा जास्त काळजी घेण्याची आवश्यकता, असे अंबरनाथ येथील वैद्यकीय चिकित्सक डॉ. नागेश टोणपे यांनी सांगितले.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या