22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रवाईन विक्रीच्या धोरणावरुन अण्णा हजारे सरकारवर संतापले

वाईन विक्रीच्या धोरणावरुन अण्णा हजारे सरकारवर संतापले

एकमत ऑनलाईन

राळेगण सिद्धी : सत्तेत असताना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीस परवानगी दिली होती. यावरुन राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यावेळी भाजपने महाविकास आघाडी सरकाला चांगलेच धारेवर धरले होते. नव्याने सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकार मॉलमध्ये वाईन विक्री करण्याबाबतचें धोरण राबवणार आहे.

उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मॉलमध्ये वाईन विक्री करण्याच्या धोरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. देसाईंच्या प्रतिक्रियेनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी नव्या सरकारलाच थेट इशारा दिला. मॉल संस्कृती ही आपली नाही. ती विदेशी संस्कृती आहे. आताचे सरकार मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेईल असे मला वाटत नाही. पण, तसे झाले तर नाइलाजास्तव आम्हाला आमच्या मार्गाने जावे लागेल, असा इशारा अण्णांनी सरकारला दिला आहे.

मॉलमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णयासंदर्भात लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. अनेकांनी आपली मते मांडली आहेत. या सर्व मतांचा विचार करुन ड्राफ्ट तयार केला जाणार आहे. जनतेच्या मताचा विचार करुन मॉलमध्ये वाईन विक्री करण्याबाबत धोरण तयार करण्यात येणार आहे. हा वाईन विक्रीच्या धोरणाचा ड्राफ्ट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचेही देसाईंनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या