25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रवाचाळवीरांना आवरा, मंत्रिपदाचे भान ठेवा

वाचाळवीरांना आवरा, मंत्रिपदाचे भान ठेवा

एकमत ऑनलाईन

-अजित पवारांनी खडसावले

मुंबई : मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे केवळ सरकारचीच नव्हे तर राज्याची प्रतिमा डागळत आहे. आपण एका जबाबदार पदावर आहोत याचे तरी बोलताना भान ठेवा, मंत्रीपदे येतात आणि जातात हे विसरू नका, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज वाचाळ मंत्र्यांना फटकारले.

आठवडाभराच्या अज्ञातवासातून परतलेल्या अजित पवार यांनी आज प्रदेश कार्यालयात जनता दरबाराला हजेरी लावली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर व वाचाळ मंत्र्यांवर तिखट शब्दात टीका केली. काही मंत्री वाट्टेल ते बोलतात, मध्यंतरी अब्दुल सत्तार हे माझी बहिण सुप्रिया हिला काही बोलले. विनाशकाले विपरीत बुद्धी…. एवढेच म्हणावे लागेल. आपण काय बोलतोय, याचे भान ठेवले पाहिजे. मंत्री पदे येतात… जातात… कोण आजी… कोण माजी असतात. परंतु शेवटी आपण नागरीक आहोत संविधान, कायदा, नियम याचा सर्वांनी आदर करायचा असतो, लोक ऐकून घेत असतात…पहात असतात …लक्षात ठेवत असतात, हे लक्षात ठेवा. तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात, मंत्री आहात. तुम्ही शपथ घेतलेली आहे… तुमच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे, याची जाणीव ठेवा, अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारमधील वाचाळवीरांना फटकारले.

प्रशासनावर प्रचंड दबाव
अधिकारी व पोलिसांवर सध्या वरून मोठ्या प्रमाणावर दबाव आणला जातो आहे. वरिष्ठ पातळीवरून फोन येतात. थेट मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येतात. मंत्रालयातील सचिव दर्जाचे अधिकारीदेखील तणावात काम करतात. अशीच परिस्थिती राहिली तर राज्याचे चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला. या सरकार किती लोकांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे, याची माहिती मी माहितीच्या अधिकारात मागवली आहे. त्यांना खरंच वाय प्लस दर्जाची सुरक्षा आवश्यक आहे का? … काहींचा तर ३०-३० सरकारी गाड्यांचा ताफा फिरत आहे. मी उपमुख्यमंत्री होतो जास्त गाड्या असल्या की नको सांगत होतो. हा पैसा तुमचा नाही… सरकारकडे टॅक्स रुपाने आलेला आहे. ज्याना गरज आहे त्या सर्वांना संरक्षण द्या, पण सरसकट सगळ््यांना, अगदी माजी नगरसेवकांनाही सरकारी संरक्षण देणे म्हणजे अतीच होतेय, अशी टीका अजित पवार यांनी केली.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या