29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रवादग्रस्त कीर्तनाने इंदुरीकर महाराज संकटात

वादग्रस्त कीर्तनाने इंदुरीकर महाराज संकटात

एकमत ऑनलाईन

अहमदनगर : समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी पुत्रप्राप्तीसंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण अद्याप न्यायालयात सुरू आहे. अशातच आता त्यांनी कोरोनासंसर्गाबद्दल केलेल्या वक्तव्याने पुन्हा त्यांच्यावर संकट आले आहे. मी माळकरी असल्याने मला कोरोना होणार नाही मात्र माळ काढणा-यांना कोरोना गाठणारच, असे वक्तव्य इंदुरीकरांनी कीर्तनातून केले. मात्र अशा वक्तव्याने ते समाजात अंधश्रद्धा पसरवत असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.

कोरोना ही महाभयंकर महामारी आहे. अनेकांचा कोरोनाने मृत्यू झाला असून अनेक जण सध्या मृत्यूचा सामना करत आहेत. सरकारसुद्धा कोरोना निर्मूलनासाठी जनजागृती करत आहेच, परंतु स्वत:ला कीर्तनकार म्हणविणारे इंदुरीकर माळ काढणा-यांना कोरोना गाठणारच, असे सांगून कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवत आहेत,’ असा आरोप देसाई यांनी केला आहे.

सरकारही इंदुरीकरांना सामील
सरकार आणि विरोधी पक्षातील नेते आयोजित करत असलेल्या कार्यक्रमांना इंदुरीकरांना बोलविले जाते. तेथे गर्दी जमा होते. आता लवकरच निवडणुका आहेत. म्हणूनच दरवेळी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न या सर्व नेत्यांकडून केला जातो. यापूर्वीसुद्धा इंदुरीकर यांच्या कोरोनावरील वक्तव्यावर सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे सरकारने इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा अंधश्रद्धा पसरवण्यात सरकारसुद्धा सामील आहे असे जनतेला वाटेल, असे टीकास्त्र सरकारवरही देसाई यांनी सोडले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या