19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeमहाराष्ट्रविलीनीकरणावर चाक अडलेलेच

विलीनीकरणावर चाक अडलेलेच

एकमत ऑनलाईन

मुंबई : गेल्या २२ दिवसांपासून एसटी कर्मचा-यांचा संप सुरू आहे. राज्यातील विविध भागातून हे कर्मचारी आझाद मैदानात आले आहेत. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत कामावर जाणार नाहीत या भूमिकेवर कर्मचारी ठाम आहेत. पगारवाढीनंतरही हा संप सुरू आहे. विलीनीकरणाच्या मुद्यावर कामगार अडून बसले आहेत. तर दुसरीकडे सरकारनेही निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत ८१९५ कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे. तर, १८२७ लोकांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

बुधवारी मुंबईत पाऊस पडत असतानाही एसटी कर्मचारी मैदानात ठाण मांडून आहेत. ऊन असो की पाऊस कितीही मोठे तुफान आले तरी जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हटणार नाही असा निर्धार या कर्मचा-यांनी केला आहे.

नागपुरात ४०० कर्मचारी निलंबित
४ नागपुरात आणखी २० संपकरी कर्मचा-यांचा मंगळवारी निलंबित करण्यात आले. त्यामुळे नागपुरातील निलंबित कर्मचा-यांची संख्या ४००वर गेली आहे. याआधीच ९० रोजंदारी कर्मचा-यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. मात्र कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. नागपुरात एसटी बंद असल्याने प्रवाशांना खासगी बसचा आधार घ्यावा लागत आहे.

नंदुरबारमध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय
४ नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विभागाने शाळा सुरू केल्या असल्या तरी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना एसटीच्या संपाचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. नंदुरबार जिल्हा आदिवासी दुर्गम भाग असल्याने विद्यार्थी मोठ्या संख्येने ग्रामीण भागातून शहरी भागांमध्ये शिक्षणासाठी ये-जा करत असतात. त्यामुळे पहिल्याच दिवशी शाळेतील पटसंख्येवरही एसटी संपाचा परिणाम दिसून आला आहे.

सोलापुरात १४ कर्मचारी कामावर
सोलापूर विभागात केवळ १४ चालक-वाहक कामावर परतले. तर पुण्यात काल २२ कर्मचा-यांचे निलंबन करण्यात आले आहे. पुण्यात लालपरी सुरू नसल्याने खासगी, शिवशाही बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. जळगावातही संपामुळे २२ दिवसांपासून एकूण ४९ बसेस जागेवर थांबून आहेत. त्यामुळे संपातील २२ कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या