21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रशपथ घेतलेल्या मंत्र्यांना अखेर आठवले बाळासाहेब ; शिवतीर्थावर जावून केले अभिवादन

शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अखेर आठवले बाळासाहेब ; शिवतीर्थावर जावून केले अभिवादन

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिंदे सरकारचा दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यात शिंदे आणि फडणवीस यांच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शिंदे गटातील मंत्र्यांना दोन दिवसांनंतर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली आहे.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर या मंत्र्यांनी शिवतीर्थावर येऊन आज गुरुवारी सकाळी बाळासाहेबांचे दर्शन घेतले. शिवसेनेने या बंडखोरांना आमदार बनवले असून, त्यांना आता शिवतीर्थावर येऊन बाळासाहेबांच्या दर्शनाची गरज राहिली नाही, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात येत होती. त्यानंतर अखेर आज या बंडखोर आमदारांनी शिवतीर्थावर जाऊन दर्शन घेतले आहे.

शिंदे गटाकडून एकूण ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण, शपथ घेतल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ मैदानावर वंदन करण्यासाठी कोणताही मंत्री पोहोचला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली होती. अखेर मंत्री दीपक केसरकर, संजय राठोड, शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील यांच्यासह इतर पदाधिका-यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केले.

अजून खातेवाटप नाही
आम्हाला अजूनही खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे अजून कामकाज सुरू झाले नाही. मुख्यमंत्री शिंदे हे भर पावसामध्ये शिवतीर्थावर आले होते. त्यामुळे आमची निष्ठा ही बाळासाहेबांसोबतच आहे. किशोरी पेडणेकर या आमच्याच जिल्ह्याच्या आहे. त्यांनी काय टीका केली, याबद्दल मला काही बोलायचे नाही. त्यांना काही सांगितले असेल तर आम्ही त्यावर बोलणार नाही.

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या