22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रशिक्षकांनाही शेतीचे प्रशिक्षण देणार

शिक्षकांनाही शेतीचे प्रशिक्षण देणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : शेतक-यांना येणा-या अडचणी दूर करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दोन दिवसांपूर्वी दिले आहेत. दरम्यान आता अब्दुल सत्तार यांनी शिक्षकांनाही शेतीचे प्रशिक्षण देणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, ही घोषणा अद्याप प्रत्यक्षात उतरलेली नाही. पाचवीपासून शेतीचे धडे देणार असल्याचेही सत्तार यांनी म्हटले आहे. अब्दल सत्तार यांनी मुलाखत देताना यासंदर्भात माहिती दिली. शेतीत तरुणांना निपुन करण्याच्या उद्देशाने हे धोरण राबवण्यात येणार आहे.

शेतीतले अनेक छोटे मोठे प्रकार असतात. गायींना चारा कसा द्यायचा अशा अनेक गोष्टी असतात. या सर्वाचे प्रशिक्षण लहानपणापासून विद्यार्थ्यांना शिकवल्या तर याचे परिणाम भविष्यात चांगले असू शकतात. नोकरी नाही मिळाली तर त्यांना शेतीदेखील करता येत नाही. जर त्याला लहानपणापासून शेती कशी करावी याचे जर शिक्षकांनी ट्रेनिंग दिले तर शिक्षक विद्यार्थ्यांना ट्रेंिनग देईल. यामध्ये नांगर धरण्यापासून अधुनिक शेतीचं प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे. शिक्षकांना शेतीचे ट्रेनिंग देण्याची जी रचना आहे हे सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालू. त्यांना हा निर्णय पटला तर ते शिक्षणमंत्र्याला आदेश देतील असे सत्तार यावेळी म्हणाले. तसेच, यासर्वाचा खर्च कृषी मंत्रालयाने द्यायचा की शिक्षणमंत्रलयाने याची बैठक होईल अशी माहिती सत्तार यांनी यावेळी दिली.

पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना कृषिशिक्षण
पाचवी ते बारावी असे सात वर्ष विद्यार्थ्याला शेतीचे शिक्षण दिले जाईल. याचा भविष्यात फायदा होईल असे मला वाटते. माझ्या मनात असणे म्हणजे ही गोष्ट फायनल नसते असेदेखील हजरजबाबदारीने सत्तार यांनी यावेळी नमुद केले. तसेच मी कोणता निर्णय जाहीर केलेला नाही. मी मागणी करत आहे. मुख्यमंत्र्याच्या मंजुरिशिवाय काही मिळत नाही. मुख्यमंत्री यांच्यासोबत एकदा चर्चा झाली आहे. याचा प्रस्ताव लवकरच ठेवण्यात येईल. शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेणार. असल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या