22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेना देणार मुर्मू यांना पाठिंबा; अधिकृत घोषणेची शक्यता

शिवसेना देणार मुर्मू यांना पाठिंबा; अधिकृत घोषणेची शक्यता

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा विरोध डावलून बहुतांश खासदारांच्या मागणीला प्राधान्य देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचे वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आहे.

राष्ट्रपतिपदासाठी शिवसेना एनडीएच्या उमेदवार असलेल्या द्रौैपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार हे जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेनेकडून आता अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. या निर्णयाला खरेतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोध केला होता. मात्र त्यांचा विरोध डावलून उद्धव ठाकरे बहुतांश खासदारांच्या मागणीला मान देणार असल्याची शक्यता आहे.

शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा द्यावा यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र दिले होते. याच मुद्यावरून शिवसेनेचे खासदारही फुटणार अशी चर्चा रंगायला लागली होती. अखेर शिवसेना आपले वजन द्रौपदी मुर्मू यांच्याच पारड्यात टाकणार असल्याचे दिसतेय. मात्र यावरून महाविकास आघाडीत फूट पडणार का? हे पाहावे लागणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या