21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रसंकटाच्या काळात तुमच्या सोबत; उद्धव ठाकरेंनी घेतली राऊतांच्या कुटुंबियांची भेट

संकटाच्या काळात तुमच्या सोबत; उद्धव ठाकरेंनी घेतली राऊतांच्या कुटुंबियांची भेट

एकमत ऑनलाईन

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी काल संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले होते. तसेच त्यांची ईडी कार्यालयात नेऊन चौकशी देखील करण्यात आली होती. अखेर रात्री उशीरा संजय राऊत यांना अटक करण्यात आली. दरम्यान, आता उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या परिवाराला धीर देण्यासाठी भांडूप येथील घरी दाखल झाले होते.

यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या आईंनी भेट घेतली. संकटाच्या काळात मी तुमच्या सोबत आहे’’, असा शब्द त्यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबियांना दिला.
रविवारी संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आईंना अश्रू अनावर झाले होते. तसेच त्याच्या परिवारातील इतर सदस्यदेखील भावूक झाल्याचे बघायला मिळाले. संकटाच्या काळात शिवसेना त्यांच्या पाठिशी आहे, हे दाखवण्याचा उद्ध ठाकरेंचा प्रयत्न आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या