26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeऔरंगाबादसराफा व्यापा-यांचे सोने, रोकड पोलिसाने लुटली

सराफा व्यापा-यांचे सोने, रोकड पोलिसाने लुटली

एकमत ऑनलाईन

सिडको पोलिस ठाण्यातील पोलिसावर गुन्हा
औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार उघडकीस
औरंगाबाद : पोलिस दलात खळबळ उडवून देणारी धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आली असून, चक्क एका पोलिस कर्मचा-यानेच सराफा व्यापा-याला लुटण्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचा-याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष वाघ असे या पोलिस कर्मचा-याचे नाव आहे. तो सोयगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.

संतोष वाघ याने आपला मित्र रामचंद्र दहिवाळ याच्यासह सराफा व्यापा-याला केंब्रिज चौकात अडवले. त्यानंतर वाघ याने पोलीस असल्याचे सांगत चौकशी करण्याच्या बहाण्याने तब्बल २४ तोळे सोनं आणि ८ लाख ४० हजार रुपये रोख सराफा व्यापा-याकडून लुटले. अशोक विसपुते असे सराफा व्यापा-याचे नाव आहे. सराफा व्यापा-याने पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार दिली.

सराफा व्यापारी अशोक विसपुते यांनी या घटनेनंतर पोलिसांनी संतोष वाघच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सोयगाव पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार असलेला संतोष वाघ विरोधात २४ तोळे सोने, ८ लाख ४० हजार रोख रक्कम चोरली याप्रकरणी गुन्हा दाखल असून या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना तब्यात घेतले आहे.

लुटण्याच्या या गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली गाडी जप्त केली असल्याची माहिती सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या