18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रसावरकरांचा अवमान करणा-यांच्या गळ््यात गळे घालणा-यांनी स्व.बाळासाहेबांचा वारसा सांगू नये

सावरकरांचा अवमान करणा-यांच्या गळ््यात गळे घालणा-यांनी स्व.बाळासाहेबांचा वारसा सांगू नये

एकमत ऑनलाईन

-फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका

मुंबई : राहुल गांधी यांनी वीर सावरकरांविषयी चुकीचे वक्तव्य केले आहे. त्याच राहुल गांधींसोबत गळ््यात गळे घालून आदित्य ठाकरे पदयात्रा करतात. आमचे जाऊद्या, पण किमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील, याचा तरी विचार करायचा असता. तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंशी नाते सांगण्याचा अधिकार आहे का, अशी जळजळीत टीका उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज आदित्य ठाकरे यांच्यावर केली.

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दादर येथील स्वा. सावरकर स्मारकात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच रोखण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात यावरून राहुल गांधी व आदित्य ठाकरे यांच्यावर जळजळीत टीका केली. स्व. बाळासाहेब ठाकरे यांना वीर सावरकरांचा जाज्वल्य अभिमान होता. त्यांचे विचार बाळासाहेब ठाकरेंनी पुढे नेले. मात्र आताचे चित्र पाहिले तर वाईट वाटते. स्वा. सावरकरांना शिव्या देणा-यांना तुम्ही जवळ करणार असाल तर बाळासाहेब ठाकरेंशी नाते सांगण्याचा तुम्हाला अधिकार काय, असा सवाल त्यांनी केला. यामुळेच इथे बाळासाहेबांची शिवसेना तयार झाली आहे. एकनाथ शिंदे हे रक्ताच्या नात्याने बाळासाहेबांचे काहीही लागत नसतील. पण बाळासाहेबांचा विचार ते पुढे घेऊन जात आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या