पुणे : पुण्यातील अनिरुद्ध शेठ या चार्टर्ड अकाऊंटंटवर त्याच्या ऑफिसमधील रिसेप्शनिस्ट महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिसेप्शनिस्ट महिलेला पेस्ट्री आणि कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजून अनिरुद्धने बलात्कार केल्याचा आणि त्याचा व्हीडीओ तयार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
तो व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनिरुद्ध शेठ आपल्यावर गेल्या काही दिवसांपासून बलात्कार करत होता, असाही त्याच्यावर आरोप आहे. येरवडा पोलिस ठाण्यात अनिरुद्ध शेठवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय महिला सीए असलेल्या अनिरुद्ध शेठ याच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत होती. मागील काही वर्षांपासून त्यांच्यावर सतत लैंगिक अत्याचार सुरू होते, असा आरोप महिलेने केला आहे. २०१९ ते २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी त्या महिलेने तक्रार दिली आहे.