27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeमहाराष्ट्रसीमाप्रश्नाबाबत खा. महाडिकांवर मोठी जबाबदारी

सीमाप्रश्नाबाबत खा. महाडिकांवर मोठी जबाबदारी

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत बैठक बोलावली. दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस उपस्थित राहण्याची संधी खासदार धनंजय महाडिक यांना मिळाली. दोन्ही राज्यातून केवळ एकमेव खासदार म्हणून महाडिक यांची उपस्थिती चर्चेत आली. सीमाभागातील लोकप्रतिनिधी, भूमिका मांडण्याची तळमळ, सीमा प्रश्नाचा अभ्यास आणि लोकसभेत संसदरत्न म्हणून सन्मान होताना त्यांची तयार झालेली वेगळी प्रतिमा यामुळेच महत्त्वाच्या बैठकीस त्यांना उपस्थित राहता आल्याचे समजते.

गेले पंधरा दिवस महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न उफाळून आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराव बोम्मई यांनी महाराष्ट्रातील तीन तालुक्यांवर केलेला दावा, बेळगाव मध्ये महाराष्ट्राच्या वाहनावर झालेली दगडफेक आणि नेत्यांना तेथे जाण्यास विरोध या पार्श्वभूमीवर हा प्रश्न आणखी पेटला. यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यातील प्रमुखांची बैठक घेतली. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व त्या राज्याचे गृहमंत्री उपस्थित होते. शहा यांनी या नेत्यांना काही सूचना देतानाच काही पर्याय सुचविले.

दोन राज्याच्या प्रमुखांच्या बैठकीस खासदार धनंजय महाडिक यांनाही उपस्थित राहण्याची संधी मिळाली. यामुळे एकमेव खासदार उपस्थित असल्याने त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. महाडिक हे फडणवीस यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. कोल्हापूर हे सीमारेषेवर असल्याने त्यांचा या विषयावर अभ्यास आहे. लोकसभेत काम करताना त्यांना आपली अभ्यासू खासदार अशी प्रतिमा निर्माण केली. यामुळे त्यांना तीनवेळा संसदरत्न पुरस्कारही मिळाला. या सर्व पार्श्वभूमीवर महाडिक यांच्या दिल्लीतील या बैठकीतील उपस्थिती त्यांचे राजकीय महत्त्व वाढविणारे असल्याचे संकेत आहेत. त्यांना पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी देण्याच्या हालचाली पक्षात सुरू आहेत. आजच्या बैठकीतील त्यांची एकमेव उपस्थिती ही त्यांना पक्षात मोठी संधी मिळणार असल्याची नांदी असल्याचे बोलले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या