24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रसुरेश कलमाडींची दुसरी इनिंग

सुरेश कलमाडींची दुसरी इनिंग

एकमत ऑनलाईन

पुण्यात राजकीय घडामोडींना वेग
पुणे : पुण्याच्या राजकारणात एकेकाळी प्रचंड दबदबा असणारे काँग्रेसचे माजी नेते सुरेश कलमाडी पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

यासाठी निमित्त ठरला आहे तो, सुरेश कलमाडी यांचा पुणे फेस्टिव्हल. या सोहळ्याचे शुक्रवारी उद्घाटन होणार आहे. पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा, हे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पुण्यात कलमाडी आणि भाजपच्या जवळकीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

२०११ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळाप्रकरणामुळे सुरेश कलमाडी यांच्या राजकीय कारकीर्दीला ग्रहण लागले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा असणा-या सुरेश कलमाडी यांची राजकीय इनिंग अचानक संपुष्टात आली. काँग्रेसने सुरेश कलमाडी यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. मात्र, आता १० वर्षे उलटूनही काँग्रेसने सुरेश कलमाडी यांना लांब ठेवले आहे.

कलमाडी भाजपसाठी अ‍ॅडव्हान्टेज!
एक काळ होता जेव्हा पुणे महापालिका कलमाडी गटाच्या ताब्यात होती. निर्णय देखील कलमाडी हाऊसमधूनच व्हायचे. कलमाडी आपल्या केबिनमध्ये झुलत्या खुर्चीत बसून सूत्र हलवायचे. तिथूनच पदांचे वाटप व्हायचे, असा तो काळ. कलमाडींचा पुणे फेस्टिव्हल म्हणजे डोळे दीपवणारा अनुभव असायचा. आजदेखील कलमाडी हे पुण्याच्या राजकारणात आपला प्रभाव राखून आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कलमाडी पक्षात आल्यास भाजपला निश्चितच फायदा होऊ शकतो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या