26.9 C
Latur
Sunday, May 29, 2022
Homeमहाराष्ट्रसोमवारपासून राज्यातील शाळा सुरू होणार !

सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू होणार !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२० (प्रतिनिधी) कोरोनाच्या संसर्ग कायम असला तरी त्याची तीव्रता फारशी नसल्याने राज्यभरातील बालवाडीपासूनच्या सर्व शाळा सोमवारपासून सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मात्र शाळा सुरू करण्याचा अंतिम निर्णय त्या त्या ठिकाणची परिस्थिती विचारात घेऊन स्­थानिक प्रशासनाकडून घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पालकांची संमती व कोरोनाच्या नियमांचे पालन याबाबत आधी जाहीर केलेली नियमावली यापुढेही लागू राहील असेही त्यांनी सांगितले.

देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू असून महाराष्ट्रासह सहा राज्यातील स्थितीचिंता वाढवणारी असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आजच एका पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचवेळी इकडे मुंबईत सोमवारपासून शाळा सुरू करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे १५ फेब्रुवारी पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र संसर्ग अधिक असला तरी त्याची तीव्रता कमी असल्याने शाळा सुरू करण्यासाठी सरकारवर दबाव वाढला होता. कोरोनामुले जवळपास गेले दोन वर्ष शाळा बंद असून विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतेच आहे, याचे मानसिक परिणामही होत असल्याने शाळा सुरू करण्याची मागणी शिक्षण तज्ञ, शिक्षक व पालक संघटनांकडून होत होती. त्यामुळे आवश्यक दक्षता घेऊन शाळा सुरू करण्याची परवानगी दिली जावी, असा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावाला मुख्यमंर्त्यांनी मंजुरी दिली असल्­याची माहिती शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सोमवारपासून पहिली ते बारावी, तसेच पूर्व प्राथमिक शाळाही सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असल्­याचे सांगतानाच, याबाबतचा अंतिम निर्णय मात्र स्­थानिक प्रशासन करेल असे शिक्षणमंर्त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाची स्­थानिक परिस्­थिती पाहून महापालिका आयुक्­त, जिल्­हाधिकारी शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतील असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्यात येतील. शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र आणावे लागेल.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या