22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्र‘हाफकीन’ माणसाला बॅन करा; आरोग्यमंत्री सांवत

‘हाफकीन’ माणसाला बॅन करा; आरोग्यमंत्री सांवत

एकमत ऑनलाईन

पुणे : ‘तुम्ही त्या हाफकीन माणसाकडून औषधें घेता ते आधी बंद करा’या विधानावरून सध्या सोशल मीडियावरराज्याचे नवे आरोग्यमंत्री तानाजी सावंत चांगलेच चर्चेत आहेत. घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर या त्यांच्या दौ-याची चांगलीच चर्चा झाली होती. त्यावरुन त्यांची थट्टाही केली जात होती. आता पुन्हा एकदा ते नेटक-यांसाठी चेष्टेचा विषय ठरले आहेत.

सोशल मीडियावर सध्या तानाजी सावंत यांच्या संदर्भातल्या एका बातमीचे कात्रण व्हायरल होत आहे. या बातमीमध्ये तानाजी सावंत यांना हाफकीन ही व्यक्ती आहे की संस्था याची माहिती नसल्याचा उल्लेख आहे. या बातमीत उल्लेख आहे की तानाजी सावंत यांनी पुण्यातल्या ससून रुग्णालयात भेट दिली. यावेळी त्यांनी डॉक्टरांना सुनावले, रुग्णालयात कमी पडणा-या औषधाबद्दलही त्यांनी संबंधितांना झापले.

तुम्ही त्या हाफकीन माणसाकडून औषधे घेता ते आधी बंद करा, अशा शब्दांत सावंतांनी वैद्यकीय अधिका-यांना झापल्याचा उल्लेख या बातमीच्या कात्रणात आहे. पुढे या बातमीत लिहिलंय की डॉक्टरांना हे ऐकून हसू आवरेना, शेवटी मंर्त्यांच्या पीएनी त्यांना कानात सांगितलं की हाफकीन ही शासकीय संस्था आहे, माणूस नाही. तेव्हा त्यांनी तिथून काढता पाय घेतला.

यावरुन आता नेटकरी सावंतांची चांगलीच खिल्ली उडवत आहेत. आपल्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना शासकीय औषध संस्थाही माहित नाही, यावरुन त्यांना टोला लगावला जात आहे. अनेक जण या बातमीचं कात्रण व्हायरल करत आहेत. तसंच त्यांच्या अज्ञानाबद्दल त्यांची थट्टा करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या