22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्र९ मनपाच्या प्रारुप मतदार याद्या १३ ऑगस्टला प्रसिद्ध होणार

९ मनपाच्या प्रारुप मतदार याद्या १३ ऑगस्टला प्रसिद्ध होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर व नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑगस्टला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. २२ ऑगस्टपर्यंत यावर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत असणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मंजुरी देताना तात्काळ निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळ्यामुळे लगेच निवडणूक घेणे शक्य नसले तरी पावसाळा संपताच सप्टेंबरनंतर एकापाठोपाठ निवडणुका घेण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून ९ महापालिकांच्या प्रारूप मतदारयद्या प्रसिद्ध करण्याच्या तारखा राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केल्या आहेत. औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर व नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या प्रारूप मतदारयाद्या १३ ऑगस्टला प्रसिद्ध होतील.

भारत निवडणूक आयोगाने ३१ मे पर्यंत अद्यावत केलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्रा धरण्यात येणार आहेत. या मतदार याद्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर १३ ऑगस्टला प्रारुपाच्या स्वरुपात प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर २२ऑगस्ट पर्यंत संबंधित ठिकाणी हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या २ सप्टेंबररोजी प्रसिद्ध केल्या जातील. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावेकिंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाहीत. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणा-या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या