36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeमहाराष्ट्रअभिनेते रितेश देशमुख करणार वेडचे दिग्दर्शन

अभिनेते रितेश देशमुख करणार वेडचे दिग्दर्शन

एकमत ऑनलाईन

मुंबई : २० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ््यावेगळ््या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मुंबई फिल्म कंपनीने आज सहाव्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता रितेश देशमुख करणार आहेत. तसेच विशेष बाब म्हणजे या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनेलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. वेड असे या चित्रपटाचे नाव असून तब्बल दहा वर्षांनंतर जिनिलिया देशमुख मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.

जिनिलिया देशमुख यांनी चित्रपटाच्या मुहूर्ताचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. रितेश देशमुख यांच्या मातोश्री श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी मुहूर्ताचा क्लॅप दिला. रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. रितेश देशमुख यांनी चित्रपट सृष्टीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, मराठी चित्रपट असो की हिंदी प्रत्येक चित्रपटात त्यांच्या देखण्या आणि उत्कृष्ट अभिनयाने रसिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे रितेश देशमुख यांच्या प्रत्येक भूमिकेचे रसिकांना आकर्षण असते. त्यातच त्यांनी २० वर्षे अभिनय क्षेत्र गाजविल्यानंतर आता एक दिग्दर्शक म्हणून पुढचे पाऊल टाकण्याचे ठरवले असून, त्यांनी वेड चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात उडी घेतली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या