19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या साथीला संभाजी ब्रिगेडची फौज

उद्धव ठाकरेंच्या साथीला संभाजी ब्रिगेडची फौज

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘मातोश्री’चे निष्ठावंत आणि उद्धव ठाकरेंच्या जवळच्या, मर्जीतल्या बहुतांश सहका-यांनी त्यांची साथ सोडली पण त्यांच्या संकटाच्या काळातही त्यांच्यासोबतीला येणा-या नव्या साथीदारांची संख्याही दखल घेण्याजोगी आहे. काल संभाजी ब्रिगेडने शिवसेनेला साथ देत येणा-या निवडणुका एकत्रित लढण्याची घोषणा केली आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसांतच मुंबईत शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचा मोठा मेळावा आयोजित केला जाणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची एकत्रित ताकद अधोरेखित होईल.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर तसेच शिवसेनेत मोठी दुफळी पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची कोणतीही मोठी सभा झाली नाही. औचित्य म्हणजे गणेशोत्सवानंतर उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होतोय. त्याअगोदर मुंबईत संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांचा मोठा मेळावा पार पडणार असल्याची माहिती मिळते आहे. चार वर्षांपूर्वी ज्या संभाजी ब्रिगेडने शिवसेना भवनावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला विरोध केला त्याच संभाजी ब्रिगेडबरोबर काल शिवसेनेने युतीची घोषणा केली. प्रादेशिक पक्षांना संपविण्याची मोहीम केंद्रातील सत्ताधा-यांनी हाती घेतलेली असताना मराठी अस्मिता आणि लोकशाही वाचविण्यासाठी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. त्याचबरोबर आमच्या संकटाच्या काळात आमच्याकडे देण्यासाठी काहीही नसताना लढवय्या सहकारी आमच्याकडे आलेले आहेत, असे म्हणत संभाजी ब्रिगेड संघटनेचे मोठेपण अधोरेखित केले.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौ-याआधी शिवसेना-संभाजी ब्रिगेडचा मेळावा मुंबईत घेण्याबद्दल चर्चा झाली आहे. त्याच संयुक्त बैठकीत मेळाव्याची रूपरेषा ठरवली जाईल, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरेंची पहिली सभा
मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर असल्याने मुंबईतल्या कार्यकर्ते-पदाधिकारी ज्यामध्ये शाखाप्रमुख, विभागप्रमुखांचा मोठा मेळावा नेस्को मैदानावर होणार आहे.

उद्धव ठाकरेंची दुसरी सभा
ज्या दसरा मेळाव्याला शिवसेनेत अनन्यसाधारण महत्त्व आहे, ज्या मेळाव्यातून पक्षप्रमुख पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना पुढील वर्षभराचा कानमंत्र देतात, वैचारिक दिशा देतात, तो दसरा मेळावा यंदा ५ ऑक्टोबरला होणार आहे. उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यानिमित्त हजारो शिवसैनिकांना संबोधित करतील.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या