25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeमहाराष्ट्रदेशात ऑपरेशन लोटस?

देशात ऑपरेशन लोटस?

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अशातच, कॉँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राज्यातील राजकीय नाट्यावर प्रतिक्रीया देत त्याचा संबंध अप्रत्यक्षपणे ऑपरेशन लोटस सोबत जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानपरिषदेचा निकाल पुर्णत: महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात गेला. या पार्श्वभूमिवर कॉँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एक ट्विट केले. त्यामध्ये राज्यांची यादी जाहीर करत देशात ऑपरेशन लोटस सुरु असल्याची प्रतिक्रिया अप्रत्यक्षपणे देताना म्हटले की, ‘महाराष्ट्र आणि भारतातील लोकशाहीसाठी दु:खद दिवस! जनतेच्या जनादेशावर प्रलोभन-धमकावणे आणि भ्रष्ट राजकीय भ्रष्टाचाराचा बुलडोझर चालवला जातो, असे म्हणत सुरजेवाला यांनी कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा, उत्तराखंड, अरुणाचल, मणिपूर, मेघालय, महाराष्ट्र… अशी ‘ऑपरेशन लोटस’ झालेल्या राज्यांची यादी जाहीर केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या