24 C
Latur
Monday, September 26, 2022
Homeमहाराष्ट्रप्रतिपंढरीच्या वारीसाठी लालपरी सज्ज

प्रतिपंढरीच्या वारीसाठी लालपरी सज्ज

एकमत ऑनलाईन

नागपूर : विदर्भवासीयांची पंढरी आणि प्रतिपंढरपूर म्हणून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नागपूर जिल्ह्यातील धापेवाड्यात जत्रेची जोरदार तयारी झाली आहे. १२ ते १४ जुलै दरम्यान हा यात्रा महोत्सव पार पडणार आहे. त्यात ठिकठिकाणचे लाखो भाविक सहभागी होतील, हे लक्षात ठेवून राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेची तयारी केली आहे. जिल्ह्यातील विविध आगारांतील ४७ बसेस या तीन दिवसांत सकाळपासून रात्रीपर्यंत प्रवाशांची धापेवाडा दर्शनाची सोय करणार आहे.

पंढरपूरची आषाढी एकादशीची महापूजा अन् यात्रा संपल्यानंतर साक्षात विठ्ठल धापेवाडा येथे आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी येतो, अशी आख्यायिकच नव्हे, तर लाखो भाविकांची श्रद्धा आहे. त्याचमुळे धापेवाड्याला विदर्भाचे पंढरपूर म्हटले जाते. आषाढी एकादशीच्या तिस-या दिवशी धापेवाड्यात मोठी दर्शनजत्रा भरते.

ती पुढे दोन दिवस चालते. जत्रेला विदर्भ, महाराष्ट्रच नव्हे, तर विविध प्रांतातील भाविक गर्दी करताता. यंदा ही जत्रा १२ ते १४ जुलै दरम्यान भरणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने ठिकठिकाणच्या भाविकांना धापेवाड्यात नेण्याची आणि आणण्याची व्यवस्था केली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील पाच आगारांतील एकूण ४७ बसेस १२ ते १४ जुलै दरम्यान यात्रा स्पेशल म्हणून सज्ज करण्यात आल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या