25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeमहाराष्ट्रविदर्भात मुसळधार

विदर्भात मुसळधार

एकमत ऑनलाईन

नागपूर : नागपूरसह संपूर्ण विदर्भात दमदार पाऊस होत आहे. विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह सकाळपासून पावसाला सुरुवात झाली तर दिवसभर थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने सरी बरसल्या. नागपुरात दिवसभर ढगाळ वातावरण होते, तर सायंकाळपासून पावसाचा जोर वाढला. २४ तासांत विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली. सर्वाधिक १०८.४ मिमी पाऊस वर्धा जिल्ह्यात झाला.

विदर्भात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. नागपूरसह सर्वत्र आज जोरदार पाऊस झाला. बुलडाणा, वर्धा, चंद्रपूर, नंदूरबार जिल्ह्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातून वाहणा-या सिपना नदीला मुसळधार पावसामुळे पूर आला. या पुरात धारणी तालुक्यातील दिया या गावातील एक युवक आज सकाळी वाहून गेला. कृष्णा कासदेकर (३५) असे पुरात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.

मेळघाटातून वाहणा-या सिपनासह इतर सर्वच नद्यांना पूर आला असल्याने मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती तालुक्यात पुरात प्रवासी वाहन वाहून गेले. मात्र, त्यानंतर थरारकपणे बचाव करण्यात आला.

यासोबतच यवतमाळ जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील लाडकी गावात मुसळधार पावसामुळे नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे याच पुलावर दुचाकी घेऊन स्टंट करणे लाडकी येथील मंगेश मांडवकर याला चांगलेच महागात पडले. त्याची दुचाकी पाण्यात वाहन गेली.

गडचिरोली जिल्ह्यात
ट्रक गेला वाहून, ३ ठार
गडचिरोली जिल्ह्यात पावसाने कहर केला असून, प्रवासी घेऊन जाणारा ट्रक पुरात वाहून गेला. यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. आलापल्लीवरुन भामरागडला जात असताना ट्रक पुराच्या पाण्यात वाहून गेला.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या