22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeमहाराष्ट्रशेतक-यांना लुटणा-या ६ कंपन्यांवर फौजदारी

शेतक-यांना लुटणा-या ६ कंपन्यांवर फौजदारी

एकमत ऑनलाईन

कंपन्यांनी पुरविला अप्रमाणित खत, केंद्राकडून दखल
मुंबई : सध्या राज्यात रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा सुरू आहे. काही ठिकाणी मिश्र खतांची विक्री करणा-यांच्या टोळ््या कार्यरत आहेत. यावर नजर ठेवण्यासाठी केंद्राने पथके तयार केली असून, केंद्रीय रसायने व खते मंत्रालयाने ८ राज्यांत धाडी टाकल्या. यात शेतक-यांची लूट करणा-या महाराष्ट्रातील ६ कंपन्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे आदेश मोदी सरकारने राज्यांना दिले.

रासायनिक खतांचे रॅकेट चालविणा-या महाभागांना संबंधित राज्यांमधील काही कृषी अधिकारीच आतून पाठिंबा देत आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील काही मिश्र खतांच्या उत्पादक कंपन्यांची ३० एप्रिल २०२२ रोजी अचानक तपासणी केली. त्यात महाराष्ट्रातील काही धक्कादायक बाबी समोर आल्या. अनुदानित खते काळ््या बाजाराकडे वळविणे तसेच खतांचा गैरवापर करणे, अनधिकृतपणे साठे करणे, अनुदानाचा गैरफायदा घेणे असे प्रकार दिसून आले. तसेच अवैध कागदपत्रांच्या आधारे खतांची अनधिकृत खरेदी, उत्पादन व विक्री करणा-या प्रकल्पांचाही शोध घेतला.

यामध्ये भाजपचे नेते व माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल कंपनीसह बसंत अ‍ॅग्रो टेक (सांगली), विदर्भ मार्केटिंग फेडरेशन (नागपूर), शेतकरी सहकारी संघ (कोल्हापूर), देवगिरी फर्टिलायझर्स (औरंगाबाद) या संस्थांचा समावेश आहे. दरम्यान, तत्कालीन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी २०१९ मध्येच लोकमंगलवर फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते. त्यांच्याकडील खताचा नमुना अप्रमाणित आढळून आला. त्यामुळे कंपनीविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेशही देण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या