22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeमहाराष्ट्र३ मे नंतर राजकीय दिशा स्पष्ट करणार

३ मे नंतर राजकीय दिशा स्पष्ट करणार

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : येत्या ३ मे रोजी माझ्या खासदारकीचा कार्यकाळ संपतो आहे. ३ मे नंतर मी माझी राजकीय दिशा स्पष्ट करेन, ती नक्कीच वेगळी असेन, असे मोठे वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ३ मे नंतर माझी राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. खासदारकीचा कार्यकाळ संपल्यावर राजे भाजपत प्रवेश करणार, सेना-राष्ट्रवादीकडे जाणार की आपला नवा पक्ष स्थापन करणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडते. संभाजीराजे छत्रपती यांनी मतदानाचा अधिकार बजावला. जवळपास ३० सेकंद विचार करून मी कुठे मदतान करायचा हा निर्णय घेतले, असे संभाजीराजेंनी सांगितले. यावेळी खासदारकीचा कार्यकाळ संपल्यावर तुमची राजकीय भूमिका काय असेल, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ३ मे नंतर मी माझी राजकीय दिशा स्पष्ट करेन, ती नक्कीच वेगळी असेन, असे मोठे वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

खा. संभाजीराजे यांच्या भूमिकेकडे लक्ष
संभाजीराजेंच्या शब्दाला मराठा समाजात विशेष मान आहे. त्यांच्या शब्दाला वजन आहे. त्यांच्या एका हाकेला ओ देण्यासाठी हजारो तरुण तयार असतात. त्यांचे नेतृत्वगुण आणि संघटन कौशल्यदेखील कमालीचे आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे नव्या पक्षाची घोषणा करणार की सेना-भाजप-राष्ट्रवादीशी घरोबा करणार, हे ३ मे नंतरच स्पष्ट होईल. छत्रपती संभाजीराजे पुढची राजकीय दिशा काय ठरवतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या