23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रनाशिक जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात ७ हजार कोटींची गुंतवणूक

नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात ७ हजार कोटींची गुंतवणूक

एकमत ऑनलाईन

नाशिक : नाशिकमध्ये उद्योग विस्ताराला पोषक वातावरण असून, उद्योगांना आवश्यक असलेल्या जागेची उपलब्धताही करून देण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात दिंडोरी, मालेगाव व येवला येथे ठिकठिकाणच्या ६२ उद्योगांनी तब्बल सात हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यातून आठ हजारांहून अधिक जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

नाशिकच्या औद्योगिक विकासाला गती मिळत असून येणा-­या काळात आणखी जागा उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. शासनाच्या २०२० ते २०२२ या दोन वर्षांदरम्यान झालेल्या जागा वाटप बैठकींतून अतिरिक्त दिंडोरी औद्योगिक वसाहतीतील ९ लाख चौरस फुटांच्या ४१ औद्योगिक प्लॉटवर सुमारे ६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

या उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून सुमारे ५ हजार बेरोजगारांना नवे रोजगार निर्माण होणार असल्याने उद्योग क्षेत्रातून समाधान व्यक्त केले जात आहे. उद्योगांच्या विकासाला प्रशासनाच्या माध्यमातून गती देण्याचे काम सुरू असून, दिंडोरीच्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत सुमारे ९ लाख ९३१ चौरस मीटर जागांचे वाटप करण्यात आले असून, या माध्यमातून ५ हजार ९०१ कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या