25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रलक्झरी बसच्या अपघातात १ ठार तर १४ प्रवासी जखमी

लक्झरी बसच्या अपघातात १ ठार तर १४ प्रवासी जखमी

एकमत ऑनलाईन

पाटस : पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस (ता. दौंड) हद्दीत लक्झरी बसचालकाचा बेफिकीरपणा काही प्रवाशांच्या मुळावर उठला. लक्झरी चालकाने विरुध्द दिशेला असणा-या ढाब्यावर जाण्यासाठी बस अचानक पलिकडील मार्गावर घेतली. यावेळी ट्रक आणि बस यांच्यात धडक होऊन अपघात झाला. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर ट्रकचालकासह बसमधील चौदा प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलिस हवालदार सुनील बगाडे यांनी माहिती दिली. पुणे-सोलापूर महामार्गावरून मंगळवारी लक्झरी बस ही पुणे बाजूकडून सोलापूरला जात होती.

दौंड तालुक्यातील पाटस हद्दीत रात्री साडेअकरा वाजता टोलनाक्याच्या पुढे बसचालकाला जेवणासाठी पलिकडील बाजूला असणा-या ढाब्याकडे जायचे होते. मात्र, चालकाने कसलीच तमा न बाळगता, वाहतुकीचे कोणतेच नियम न पाळता, समोरील बाजूच्या वाहनांना इशारा न करताच बस बिनधास्त विरुध्द दिशेच्या मार्गावर घेतली त्यामुळे अपघात झाला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या