27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्र१० वर्षात राज्यात ऊस क्षेत्रात १० लाख एकरची वाढ

१० वर्षात राज्यात ऊस क्षेत्रात १० लाख एकरची वाढ

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात ऊस लागवड क्षेत्रात १० लाख एकरने वाढ झालीे. त्यामुळे सरासरी ३२ लाख टन ऊस वाढला आहे. साखर आयुक्त कार्यालयाने ही माहिती दिली.

दहा वर्षात साखर कारखान्यांची संख्याही ३० ने वाढली आहे. कारखान्यांची गाळप क्षमता दिवसाला ३ लाख टनांनी वाढली आहे. जिथे पाणी आले तिथे ऊस वाढला असे राज्यभरातील सर्वसाधारण चित्र दिसते.

महाराष्ट्राच्या २०१२-१३ च्या हंगामात उसाखालील क्षेत्र ९.६४ लाख हेक्टर होते. तेच आज १३.६७ लाख हेक्टर आहे. म्हणजेच तब्बल ४.०३ लाख हेक्टर (दहा लाख एकर) क्षेत्र वाढले.

सोलापूर, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड या जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढल्याचे चित्र आहे. याउलट तृणधान्ये (११ टक्के), कडधान्ये (२७ टक्के) व तेलबिया (१३ टक्के) पिकाखालील क्षेत्र कमी होत असल्याचे आर्थिक पाहणी अहवाल सांगतो. मावळत्या हंगामात महाराष्ट्रात सर्वाधिक २४ लाख ७८ हजार टन ऊस गाळप सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याने केले आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर उतारा असलेल्या १० पैकी सात कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. बिद्री कारखाना १२.९९ उता-यासह सर्वोच्चस्थानी आहे.

१८६९ कोटीचा एफआरपी थकीत
राज्यातील १९९ पैकी ६५ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिली आहे. १३४ कारखान्यांकडे १८६९ कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. चार कारखान्यांवर एफआरपी वसुलीसाठी आरआरसीची कारवाई करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या