22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रघरात आढळले ११कोब्रा साप

घरात आढळले ११कोब्रा साप

एकमत ऑनलाईन

भंडारा : पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक ठिकाणी सापाचे दर्शन होत आहे. पण, भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात एका घरामध्ये एक दोन नव्हे तर ११ कोब्रा साप आढळून आल्याची घटना समोर आली आहे. आधी एक साप आढळला नंतर त्यापाठोपाठ अख्ख सापाचं कुटुंबच निदर्शनास आलं.

घरात ३ नाग जातीचे दीड फुट लांब पिल्ले आढळल्याने खळबळ उडाली. घरात साप असल्याचे कळताच कावळे यांनी सर्पमित्रांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर तुमसर येथील सर्पमित्र यांना पाचारन करण्यात आले त्यांच्या शोधमोहिमेत ११ दीड फुट लांब आणि तीन दिवसाचे पिल्ले व ५ फुट लांब मादी साप पकडण्यात यश आले.

सर्व नाग विषारी साप असून यात न्युरोटॉक्झीम विष असल्याचे सर्प मित्रांनी सांगितले. पिल्यांची संख्या जास्त असु शकते असा अंदाज वर्तवन्यात आला. त्यानुसार घर मालकाला लक्ष ठेवण्याविषयी सांगण्यात आले आहे.

कारण स्वयंपाक घरात एक खोलगट खड्डा आढळून आला. यात अंडे दिल्याचे समोर आले आहे. कोब्रा नागिणीने जवळपास ३० ते ३५ अंडी दिली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. पकडलेल्या सर्व सापांना वनविभागाच्या कर्मचा-याच्या उपस्थितीत निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या