24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्र१२ राज्यपालनियुक्त आमदारांची यादी रद्द!

१२ राज्यपालनियुक्त आमदारांची यादी रद्द!

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी एक यादी पाठवली होती. आता सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना ही यादी रद्द करण्याचे पत्र पाठवले आहे. मात्र, याला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला आहे.

गेल्या आठवड्यात शिंदेंनी हे पत्र राज्यपालांना पाठवल्याची माहिती आहे. याआधी ठाकरे सरकारने पाठवलेल्या यादीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी ४ जणांचा समावेश आहे. त्यामुळे ही यादी रद्द झाल्यास मविआतील तिन्ही प्रमुख घटक पक्षांना धक्का बसणार आहे. महाविकास आघाडी सरकारने २ वर्षांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे विधान परिषदेसाठी १२ सदस्यांची यादी पाठवली होती. मात्र, राज्यपालांनी अद्याप या नावांना मंजुरी दिलेली नाही. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर सडकून टीका करत असे केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.

दानवे यांनी हे प्रकरण कोर्टात गेले होते. लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबत कोर्ट राज्यपालांना निर्देश देऊ शकत नव्हते. मात्र, तशा सूचना केल्या होत्या. असे असताना ती यादी राज्यपालांना रद्द करता येणार नाही. अशाप्रकारची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि अशापद्धतीने होत असेल तर ते चुकीचे आहे. २ वर्षे त्यांनी ही यादी पेडिंग ठेवली. हा कॅबिनेट निर्णय होता. आम्ही न्यायालयात जाऊ. जे जे काही करता येईल ते आम्ही करू. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेला आमचा विरोध असेल, असे म्हटले.

कोर्टात जाणार : दानवे
राज्यपाल पक्षपातीपणे वागत असल्याचे सिद्ध होत आहे. ठाकरे सरकारने दिलेल्या नावांची यादी राज्यपालांना रद्द करता येणार नाही. तसे केल्यास पुन्हा एकदा कोर्टात जाऊ, असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांंनी दिला आहे.

वडेट्टीवारही आक्रमक
महाविकास आघाडी सरकारची १२ आमदारांची यादी रद्द केल्यास महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात जाणार, असा इशारा काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतंिसह कोश्यारी यांना विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांसंदर्भात एक पत्र पाठवले आहे. या पत्रानंतर विजय वडेट्टीवार यांनी हा इशारा दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या