18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबई मनपातील १२ हजार कोटींच्या व्यवहाराची चौकशी सुरू

मुंबई मनपातील १२ हजार कोटींच्या व्यवहाराची चौकशी सुरू

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या व्यवहाराची चौकशी कॅगने सुरू केली आहे. आज कॅगचे ८ ते १० अधिकारी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात दाखल झाले. विविध विभागांच्या व्यवहारांच्या कागदपत्रांची त्यांनी मागणी केली असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी राज्य सरकारने कोरोना काळातील मुंबई महापालिकेच्या व्यवहाराची कॅगकडून चौकशी करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू आहे.

कोरोना काळात झालेल्या कामांच्या वाटपाची कॅग (कंट्रोल ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. कोरोना काळात लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी निविदा प्रक्रिया न राबवता कंत्राटे, वस्तू खरेदी करण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या जवळपास १० खात्यांतून झालेले व्यवहार कॅगच्या रडारवर असणार आहेत.

आज सकाळी ११ च्या सुमारास कॅगचे पथक पालिका मुख्यालयात दाखल झाले होते. या दरम्यान कॅगच्या अधिका-यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी मुंबई महापालिकेचे काही अधिकारीदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर कॅगच्या पथकाने मुंबई महापालिकेच्या अकाउंट्स विभागात जाऊन व्यवहाराची माहिती मागितली. त्या व्यवहारांचे काही कागदपत्रेही ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या