22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीची समीकरणे खडसेंसाठी बिघडणार?

राष्ट्रवादीची समीकरणे खडसेंसाठी बिघडणार?

एकमत ऑनलाईन

मलिक, देशमुखांना मताधिकार नाकारला

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता यावे अशी मागणी करणारी याचिका नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी दाखल केली. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. अखेर न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून मतदानाचा अधिकार नाकारला.

न्यायालयाने निकाल जाहीर करत अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना पुन्हा दणका दिला आहे. दोन्ही नेत्यांचा विधानपरिषदेसाठी मतांचा अधिकार न्यायालयाने नाकारला. त्यामुळे महाविकास आघाडीची दोन मते कमी होणार आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जमादार यांनी हा निकाल देत दोन्ही नेत्यांना धक्का दिला. आता विधान परिषदेचे समीकरण देखील राष्ट्रवादीला नव्याने मांडावे लागणार आहे.

खडसेंच्या विजयाचा मार्ग खडतर
नबाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोन्ही नेते राष्ट्रवादीचे असल्याने पक्षाला मोठा फटका बसू शकतो. यंदा रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिलीे. राष्ट्रवादीकडील मतांचे समीकरण पाहता सध्या खडसेंना दोन मतांची गरज आहे. भाजप देखील खडसे यांना पाडण्यासाठी आतुर आहे. गरज पडल्यास रामराजेंच्या मतांचा कोटा शरद पवार ऐनवेळी वाढवू शकतात. त्यातच हक्काची दोन मते गेल्याने एकनाथ खडसे यांचा विजयाचा मार्ग आणखी बिकट झाला आहे.

मलिकांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी सांगितले की, हे प्रकरण न्यायालयाच्या कोठडीत असताना मत देण्यासाठी एस्कॉर्टमध्ये जाण्याच्या साध्या विनंतीशी संबंधित आहे. नवाब मलिक हे सध्या रुग्णालयात आहेत आणि तुरुंगात बंदिस्त नाहीत. तसेच त्यांना अद्याप दोषी ठरवण्यात आलेले नाही, त्यामुळे त्यांना मतदान प्रक्रियेतून अपात्र ठरवण्यात आलेले नाही, असे देसाई म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या