सांगली : आषाढीवारीसाठी निघालेल्या वारक-यांच्या दिंडीत पिकअप गाडी घुसल्याने अपघात झाला. या अपघातात १४ वारकरी जखमी झाले आहेत. जखमी वारकरींना मिरज सिव्हिल आणि कवठे महाकाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, आषाढीवारीसाठी वारक-यांची दिंडी निघाली होती. ही दिंडी मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ असताना दिंडीत पिकअप जीप घुसली. या अपघातात १४ वारकरी जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात घडताच चालक गाडी सोडून पळून गेला असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली.