35.6 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home महाराष्ट्र राज्यातील 15-17 हजार रिक्त पदं भरणार : राजेश टोपे

राज्यातील 15-17 हजार रिक्त पदं भरणार : राजेश टोपे

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (25 जून) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महत्त्वाची घोषणा केली आहे. आगामी काळात 1 महिन्याच्या आत राज्यातील 15-17 हजार रिक्त जागांची पदं भरणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे  यावेळी त्यांनी कोरोना नियंत्रणासोबतच कोरोनावरील औषधांच्या उपलब्धतेसाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली.

राजेश टोपे म्हणाले, ‘रिक्त पदांचं आश्वासन आम्ही दिलं आहे. त्या भरतीचं धोरण ठरवण्यावर काम सुरु आहे. पूर्वी झालेल्या एकत्रित परीक्षांच्या गुणांवरुन काही पदं भरता येतील का यावर विचार सुरु आहे. कोणत्या पदांसाठी मुलाखती घ्याव्या लागतील यावर धोरण ठरवण्याची प्रक्रिया झाली आहे. पुढील महिन्याभराच्या आत आपल्या सर्व 15-17 हजार पदं भरण्याचं काम केलं जाईल.’

Read More  1000 मृत्यू अजूनही रेकॉर्डवर घेण्यात आलेले नाही-देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या