25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeमहाराष्ट्र१५ टक्के शुल्ककपात; सुप्रीम कोर्टाचा राज्यातील पालकांना दिलासा

१५ टक्के शुल्ककपात; सुप्रीम कोर्टाचा राज्यातील पालकांना दिलासा

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक गणित कोलमडलेल्या महाराष्ट्रातील पालकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे शैक्षणिक शुल्कात १५ टक्के कपात करावी. तसेच कोरोना कालावधीत केलेली फीवाढ रद्द करण्याबाबतचे निर्देश राज्य सरकारला दिले. यावर ३ आठवड्यात आदेश देण्याची सूचनाही न्यायालयाने दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील पालकांना दिलासा मिळणार आहे.

पालकांनी सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतर एक निवेदन प्रकाशित केले. यामध्ये त्यांनी निकालाबद्दलची सविस्तर माहिती दिली. या आधी आपणास मुंबई उच्च न्यायालयाने १ मार्च २०२१ रोजी राज्यभरातील शाळांना मागील शैक्षणिक वर्षात फी वाढ करण्यास परवानगी दिली होती आणि पालकांना कोणताही विशेष दिलासा दिला नव्हता. केवळ पालकांनी वाढीव फी भरली नाही, तर त्यांच्या मुलाला शाळेतून काढून टाकू नये, इतकाच दिलासा न्यायालयाने दिला होता. मात्र, कोरोना कालावधीत सुविधांचा वापर होत नसल्याने शाळांना फी वाढ करण्यास बंदी करावी, शाळांचे शुल्क कमी करावे, ही पालकांची मागणी मान्य करण्यास कोर्टाने नकार दिला होता, असे निवेदन म्हटले आहे.

या निर्णयाच्या विरोधात आम्ही पालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील आमच्या याचिकेची दखल घेतली. तसेच २२ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाला आम्ही केलेल्या अर्जावर ३ आठवड्याच्या आत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. असे करताना राजस्थानमधील राज्य सरकारच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ग्रा धरण्यास आदेशात नमूद केले आहे, असेही पालकांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले आहे.

देशात ४० ठिकाणी सीबीआयचे छापे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या